सोलापूर जिल्हा व पाश्चिम महाराष्ट्रचे जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या
उजनी जलाशयाचा समावेश ‘ उडान – रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम ‘ मध्ये करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे .
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन खा . सुळे यांनी लेखी निवेदन दिले आहे .
उजनीच्या पाण्यावर विमाने उतरण्यासाठी आवश्यक असणारे वातावरणदेखील येथे उपलब्ध असल्याचे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे . महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर , कोल्हापूर , तुळजापूर ही धार्मिक स्थळेही जवळच आहेत . जवळ असलेल्या नाशिक , औरंगाबाद , कोल्हापूर आणि मुंबई या विमानतळांना जोडणारे ठिकाण म्हणून हा जलसाठा विकसित होऊ शकेल .
गोवा , ठाणे क्रिक , साबरमती वॉटर – फ्रंट आणि सरदार सरोवरातील प्रस्तावित व सध्या अस्तित्वात असणाऱ्या जल – हवाई केंद्रांना जोडणारे हे ठिकाण ठरेल , असेही खासदार सुळे यांनी म्हटले आहे .
त्यांच्या या मागणीला कितपत यश येते याकडे संपूर्ण पाश्चिम महाराष्ट्रचे लक्ष्य राहणार आहे
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!