
जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी राहूल गुप्ता यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. विजयकुमार फड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी राहुल गुप्ता उस्मानाबाद जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच रुजु झाले आहेत. उस्मानाबाद जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने गुरूवार दि.८ रोजी नुतन सी ई ओ राहुल गुप्ता यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला . याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुजित किसनराव हंगरगेकर,राज्य कार्यकारीणी सदस्य सय्यद, कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे , उस्मानाबाद तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सरपंच परिषद किरण व्हरकट व संजय आसलकर,जयसिंग बोराडे,करीम बेग,आदी मान्यवर उपस्थित होते .
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर