Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > केंद्र सरकारकडून पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ

केंद्र सरकारकडून पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ

मित्राला शेअर करा

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार योजनेत सहभागासाठी २३ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

याआधीची मुदत ही 15 जुलै देण्यात आली होती.पण अनेक शेतकऱ्यांकडून योजनेशी संबंधित औपचारिक अपूर्ण राहिल्याने महाराष्ट्रात ही मुदतवाढ देण्यात आली. आता 23 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सहभागी होता येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी याबाबत आदेशाचे पत्र जाहीर केले आहे