राज्यातील वाढती रुग्ण संख्या व कोरोना संकटाचा सामना सरकार करत आहे यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही सहभाग असावा या हेतूने एक, दोन दिवसाचे वेतन कपात करून घेण्यात यावे असे निवेदन विविध कर्मचारी संघटनांनी शासनास दिले होते. त्यानुसार मे २०२१ महिन्यातील वेतनातून प्रशासकीय सेवा,शासकीय, निमशासकीय कर्मचारी अ अणि ब गट अधिकार्याचे यांचे दोन दिवसाचे तर गट-ब अराजपत्रित, गट क व गट ड या कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.याच बरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून ही दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!