कोल्हापूर – शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये काल (सोमवारी) सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाली. चिकोत्रा खोऱ्याला गारपीटीमुळे शिमला-मनालीचे रूप आले होते. पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, गारपीटीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेसुद्धा उडून गेले आहेत.
कोल्हापूरसह गडहिंग्लज, वडगाव, शाहूवाडी, इचलकरंजी आदी परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. जिल्ह्यात संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरीच होते. रस्त्यावरची वर्दळ कमी होती तर बाजारपेठाही बंद होत्या. पावसामुळे काही ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी साचले होते. सुरक्षेच्या कारणास्तव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
कागल,शाहूवाडी तालुक्यात सलग दोन दिवस वादळी पाऊस झाला. उचत गावातील तीन कुटुंबांच्या घरावर वीज कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तापमानात वाढ होत असून वातावरणात बदल होताना दिसत आहेत.
पुढील चार दिवस मध्य भारतासह राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा आगामी 4 दिवस मुंबई-कोकणसह राज्यातील सर्वच भागात सोसाट्याच्या वार्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर