Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > खंडेश्वर प्रकल्प दुरूस्तीसाठी विश्व मराठा संघाच्या वतीने मुख्यमंत्री व परंडा तहसिलदारांना निवेदन

खंडेश्वर प्रकल्प दुरूस्तीसाठी विश्व मराठा संघाच्या वतीने मुख्यमंत्री व परंडा तहसिलदारांना निवेदन

मित्राला शेअर करा

प्रकल्प दुरूस्त नाही झाल्यास आंदोलनचा इशारा

जेकटेवाडी:परंडा तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्प हा तेथील शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असणांऱ्या खंडेश्वर मध्यम प्रकल्पातील पाणी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व प्रकल्पास भरावास भेग पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करून उंडेगांव, चिंचपुर ( खु ), वाटेफळ,पारेवाडी आदी गावांना अतिदक्षतेचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला होता तसेच खंडेश्वर मध्यम प्रकल्पाची दुरुस्तीसाठी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना विश्व मराठा संघाच्या वतीने निवेदन दिनांक १८/०३/२०२१ रोजी देण्यात आले होते तरी ही आजतागायत कसल्याही प्रकारची प्रकल्पाची दुरुस्ती न करता फक्त प्रकल्पाच्या भेगा पडलेल्या ठिकाणी ताडपत्री टाकून प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या नावाखालील जेकटेवाडी,ताकमोडवाडी, देवगाव (बु. ), गोसावीवाडी( आंबी ),खंडेश्वरवाडी, चिंचपूर (खु. ) व,उंडेगाव येथील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे तसेच चालू वर्षीच्या पावसाळ्यात पण पाणी साचणार नाही व पाणी साठा न साचल्याने यापुढे ही परिसरातील गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल व दर दोन -तीन वर्षात या भागातील दुष्काळाशी येथील शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे कारण मध्यम प्रकल्प भरून वाहत असताना पण प्रकल्प नादुरूस्त असल्याने यापुढे ही तेथील शेतकऱ्यांना व गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार आहे

यासाठी प्रशांत भोसले प्रदेशाध्यक्ष विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य व छायाताई भगत महिला प्रदेशाध्यक्ष विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आज दिनांक १९/०७/२०२१ रोजी मा.मुख्यमंत्री यांना लवकरात लवकर दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास विश्व मराठा संघ धाराशिवच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच या निवेदनावरती विश्व मराठा संघ धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती सोमनाथ कोकाटे,धाराशिव चे उपाध्यक्ष तानाजी कासारे, परंडा तालुकाध्यक्ष रावसाहेब काळे,कार्याध्यक्ष नितीन सुर्यवंशी परंडा आदींच्या स्वाक्षरी आहेत.