Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > चिंता मिटली ठाकरे सरकार देणार १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस

चिंता मिटली ठाकरे सरकार देणार १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस

Female doctor showing two coronavirus vaccine options

मित्राला शेअर करा

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते ना.नवाब मलिक यांनी दिली

१८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं होण्यास मदत होणार आहे. तसंच अधिकाधिक लोकांना लस देता येणार आहे.

दरम्यान, मागच्या कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कालच जाहीर केलं आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्याची लोकसंख्या अणि लसीची उपलब्धता आणि फक्त शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण याचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्राचे लसीकरण करण्यास वेळ लागणार आहे