Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त विषेश

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त विषेश

मित्राला शेअर करा

दशा,दिशा,दुर्दशा आदिवासींची कधी संपेल विकासाची प्रतीक्षा

आदिवासीं बांधव हे साधारणपणे जंगलात, डोंगराच्या कडेकपार्‍या, दर्‍या खोऱ्यात विरळ वस्ती करून,नागरी वस्तीपासून दुर व अलिप्त राहणारा हा समाज असतो.या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी, संपर्कासाठी साधने नसल्यामुळे हि जमात आजही विकासापासून वंचित आहे.त्यांच्या राहणीमानात पाहिजे तसे परिवर्तन झालेले दिसत नाही.विकास त्यांच्या पाचवीला पुजलेला.या शब्दाच्या जवळपास पण ते दिसत नाही.अगदी साधी राहणी,त्यांची घरे म्हणजे जंगलातून तोडलेल्या लाकडापासून तयार केलेले असते.घर अगदी साधे असले तरी घरात नीटनेटकेपणा दिसून येतो.त्यांच्या पेहराव खूप साधा असतो.फक्त अंग झाकण्यासाठी कपडे असले तरी त्यांना बरे वाटते. आदिवासीं महिलां साधे राहतात.त्यांना अंगावर आभूषण घालण्याची, गोंदण्याची खूप आवड असते.उदरनिर्वाह साठी हे लोक जंगलातील फळे,वनस्पती,गायी,बकऱ्या,कोबंड्या यांच्या पासून मिळणारे पदार्थ तसेच त्यांच्या पाड्याजवळ त्यांचे शेत असते,त्या शेतात पिकणारा भाजीपाला ते अन्नपदार्थ म्हणून ग्रहण करतात, त्यांच्या फारस्या गरजा नसतात.हे बांधव निरक्षर असतात,अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे त्यांचे मुलेपण शिक्षणापासून वंचित असतात.शासन मार्फत आदिवासीं बांधवांच्या उत्कर्षासाठी खूप निधी मंजूर केला जातो पण तो निधी कितपत त्यांच्यापर्यंत पोहचतो की नाही हा एक वादातीत प्रश्न आहे.जर तो निधी त्यांच्यापर्यंत पोहचला असता त्या बांधवांच्या विकास नजरेस पडला असता.

आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे श्री निकावडे सरांनी काढलेले स्केच

आदिवासीं विद्यार्थासाठी खूप आश्रम शाळा शासनाने सुरू केलेल्या आहेत. तरी देखील खूप विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.काही मुले अर्ध्यामधूनच शाळा सोडतात.शिक्षणाची दुर्दशा आहे.मानवाच्या किमान गरजा अन्न,वस्त्र, निवारा,रस्ते,वीज, शिक्षण,पाणी ई.आहेत.ह्या किमान गरजा पण अजून त्यांच्या पुर्ण झालेल्या नाहीत. ह्या पुर्ण झाल्या तर त्यांचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही.एकीकडे मोठ्या शहरांमध्ये दुपदरी,चारपदरी,सहापदरी रस्ते मेट्रो बघायला मिळतात.हे सुध्दा आपले बांधव आहेत मग त्यांच्या घरापर्यंत एक चांगली पायवाट असली पाहिजे हि त्यांची अपेक्षा असते.ती पण त्यांच्या नशिबात नसते.खूप खडतर रस्त्याने त्यांना जावे लागते.पावसाळ्यात तर खूपच हाल होतात.एकिकडे चंद्रावर,मंगळ ग्रहावर वस्ती करून राहण्याचा मनुष्य विचार करत आहे.आणि दुसरीकडे या बांधवाचे साधे सुधे घरसुद्धा सुधरतांना दिसत नाही.मोठमोठ्या शहरामध्ये लाईटच्या उजेड रात्रंदिवस सुरू असतो.पुर्ण शहरात उजेडाचा झगमगाट दिसतो.ते दिसले ही पाहिजे पण दुसरी आपला आदिवासीं बांधव झोपडीमध्ये अंधारात राहतो त्याचे काय.त्याला झगमगाट नको आहे पण गरजेपुरता तरी त्याला विज हवी आहे.एकीकडे लाखो रूपए फि भरून शिकणारे विद्यार्थि आहेत.दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी दप्तर, पाटी,वही यांची कमतरता असणारी मुले आहेत.त्यांना मूलभूत शिक्षण जरी मिळाले तरी ते खूप समाधानी राहतील.शहरात काहि श्रीमंत माणसे एकदा वापरलेले कपडे दुस-यांदा वापरत नसतात,ईकडे यांना एकच कपडा वर्षभर वापरून फाटला तरी तोच घालतात अशी अवस्था आहे.हि आदिवासीं जमात विकासापासून अजून खूप दुर आहे.देशातील प्रत्येक शाळेत, प्रत्येक पुस्तकात प्रतिज्ञा दिलेली असते.तिचे वाचण व पठन प्रत्येक शाळेत केले जाते.

भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत

जर सारे भारतीय आपण बांधव आहोत मग,एक फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये जेवतो आणी नाइट लाइफ वाद घालणारे आणि साठी दुसरा शिळेपाक्या अन्नाच्या शोधात असे का? जर आपण सारे बांधव आहोत मग एका भावाचे पोट फूल भरलेले आहे दुसरा उपाशी का? आपण सारे बांधव आहोत मग एक महल मध्ये दुसरा झोपडी मध्ये का? आपण सारे बांधव आहोत मग एकाचा पुर्ण विकास दुसरा विकासापासून वंचित का?या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक भारतीयाने शोधली पाहिजे.
आपण सर्व,शासन, प्रशासन,राज्यकर्ते सर्व मिळूनी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जर आपली थोडी जरी उर्जा खर्ची केली तर निश्चितच आदिवासीं बांधवांची विकासाची प्रतिक्षा लवकर संपल्या शिवाय रहाणार नाही.ज्या दिवशी त्यांच्या विकास नजरेस पडेल तो दिवस खऱ्या अर्थाने आदिवासींचा गौरव दिन असेल.

शब्दांकन-श्री.यशवंत निकवाडे 
बालाजी नगर,शिरपूर,धुळे