भारत सध्या कोरोना विषाणूच्या ( Coronavirus ) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे . अशातचं भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.डॉ.रेड्डी यांच्या प्रयोगशाळेच्या सहकार्याने डीआरडीओच्या लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अॅण्ड अलाइड सायन्सेस द्वारा निर्मित कोरोनाचे ओरल औषध 2- डिऑक्सी – डी – ग्लूकोज ला भारतातील आपत्कालीन वापरासाठी मंजूर मिळाली आहे.औषधाच्या क्लिनिकल चाचणीनुसार,हे औषध रुग्णालयातील कोरोना रूग्णांच्या त्वरित पुनर्णाप्तीसाठी उपयुक्त आहे.तसेच हे औषध रुग्णांच्या ऑक्सिजनची आवश्यकता कमी करते.हे औषध घेतल्यानंतर कोरोना रुग्णांची आरटी – पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . या साथीच्या रोगात कोरोना विषाणूंशी लढा देणाऱ्यांसाठी हे औषध खूप फायदेशीर ठरू शकते . कोरोना साथीच्या रोगाविरूद्ध पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या भूमिकेनंतर डीआरडीओने कोरोनाचे औषध 2 – DG बनविण्यास पुढाकार घेतला.

More Stories
वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपन्न