Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > तेर येथे ३० बेड च्या कोरोना विलिनीकरण कक्षाचे उद्घाटन

तेर येथे ३० बेड च्या कोरोना विलिनीकरण कक्षाचे उद्घाटन

मित्राला शेअर करा

तेरः येथे कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार ,लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून महाराष्ट्र संत विद्यालयातील इमारतीत ३० बेडच्या कोरोना विलगीकरण कक्षाची स्थापन करण्यात आली.बुधवारी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . विजय विश्वकर्मा यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.या विलिनीकरण कक्षास स्थानिकचे खाजगी डॉक्टर विनामूल्य सेवा देणार आहेत यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच मजिद मणियार , केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे,विठ्ठल लामतुरे,बापू नाईकवाडी , सुमेध वाघमारे , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन सुभाष कुलकर्णी , डॉ.बालाजी खराडे,डॉ.सुनील शेंडगे , डॉ . दिपक ढेकणे , जोशीला लोमटे , ग्रापं सदस्य रवीराज चौगुले , नरहरी बडवे , गोरख माळी , तानाजी पिंपळे पांडुरंग भक्ते आदींची उपस्थिती होती.
पाणी टंचाई,भूकंप अश्या अडचणीच्या काळात तेर व परिसरातील ग्रामस्थांना महाराष्ट्र संत विद्यालय तेर यांची खूप मदत झाली आहे तसेच शाळेच्या बाबतीत ही तेर ग्रामस्थांची व लोकप्रतिनिधींनची नेहमीच सहकार्याची भावना असते.