कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली.लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका,वेळीच डॉक्टरला दाखवा,कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू,डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे,योग्य मार्गदर्शन करावे.कोरोनाचा धोका पूर्णत:टळलेला नाही हे लक्षात घ्या.असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य शासनाने बाल रोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून डॉ.सुहास प्रभू हे या अध्यक्ष तर डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक,डॉ.शशांक जोशी, डॉ.तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सुचना केल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे,मी केवळ निमित्तमात्र आहे.माझी टीम मजबूत व कुशल आहे.
कोविडग्रस्त मुलांना स्तनपान,अंगणवाडी सेविकांची भूमिका,यावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये,मुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात पण ज्यांच्यात आहेत त्याना कसे उपचार करावेत,कोविडग्रस्त मुलांची काळजी घेताना पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, मास्क,हात धूत राहणे ही काळजी कशी घ्यावी, घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त मुलांपासून कसे दूर ठेवावे,कोविडमुळे मुलांमधील फुफ्फुसाचा संसर्ग, मधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचार, मुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावी,घरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावा,अशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायची,कोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीत, अशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावे,मुलांमध्ये म्युकरमायकोसीसची किती शक्यता असते,मुलांमध्ये हायपोक्सिया होतो का? मुलांना नेमकी कोणती लस द्यावी, लहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद