
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (Maharashtra HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
विद्यार्थी वरील वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.
कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
निकाल पहाण्यासाठीवेबसाईट
https://hscresult.11thadmission.org.in/
या वेबसाईटवर आपला (HSC result) बारावी निकाल पाहू शकता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये HSC (इ.12 वी) परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार,
दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ