कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात बार्शी शहर व तालुक्यात वाढत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने 100 बेडचे कोवीड केअर सेंटर फळे भाजीपाला मार्केट येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे मालक, चंद्रकांत मांजरे यांनी दिली.
यावेळी या कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांना माफक दरात औषधे देणार असल्याची माहिती केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर उर्फ आबासाहेब राऊत व जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिजित गाढवे यांनी केली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न