भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह कार्यक्रमात कोविड योद्धे डॉक्टर,वैद्यकीय आरोग्य कर्मचारी (नर्स व वार्ड बॉय)तसेच पोलिस बांधव यांचा सन्मान व सत्कार बार्शी शहर व तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कोरोना काळात कोरोना बाधित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करून त्यांची सेवा करणाऱ्या ग्रामीण रुग्णालय बार्शी व जवाहर रुग्णालय बार्शी येथील डॉक्टर,परिचारिका व वार्ड बॉय यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना पौष्टिक आहार म्हणून उकडलेली अंडी देण्यात आली.
त्याचबरोबर कोरोना काळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणारे पोलीस बांधव यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मास्क,सॅनिटायझरचे वाटप करून पौष्टिक आहार म्हणून उकडलेली अंडी देण्यात आली.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲड.राजश्रीताई डमरे, भाजपा तालुकाध्यक्ष व जि.प.सदस्य मदन दराडे, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम,आरपीआय(आ)चे शहराध्यक्ष ॲड.अविनाश गायकवाड,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.आशाताई आवारे,नगरसेवक संदेश काकडे, जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पवार,माजी जिल्हाध्यक्ष सौ.पद्मजाताई काळे,शहर उपाध्यक्ष सौ. सुगंधाताई आगवणे, सरचिटणीस सौ.शैलजाताई गिते,युवती संघटक अमृता कांबळे,भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शकील मुलाणी, प्रशांत खराडे,सुदिप पाटील, मुकुंद यादव आदी उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत