
सोलापूर : सोलापुरातील नामांकित कंपनी बालाजी अमाईन्सने आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत पूरग्रस्तांना मदत मिळावी या उद्देशाने दि २९ जुलै २०२१ रोजी रु १ कोटीचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.
कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने CSR अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे कौतुक केले असून आभार मानले.सध्याच्या परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
व्यवस्थापकिय संचालक डी.राम रेड्डी म्हणाले कि आजपर्यंत बालाजी अमाईन्सने आजपर्यंत शिक्षण,क्रिडा आरोग्य व स्वछता , जलपुरवठा व जल संवर्धन क्षेत्रात आपले योगदान दिले आहे आहे,इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले आहे कोरोना काळात सुद्धा जिल्ह्यात व जिल्ह्य़ाबाहेरील अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट व इतर उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि असेच अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपण्याची कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके