उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची नवीन सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली आहे. सारथी संस्थेसंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून सरकारने आपल्या 13 मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीनंतर माध्यमबोलताना सांगितले.
सारथी संस्थेला स्वायत्त देण्यात आली असून.१३ मागण्या मान्य केल्या आहेत
यात ८ विभागीय कार्यालये होणार.पहिले कार्यालय कोल्हापूरला होणार आहे.
१००० कोटी आणि इतर मागण्यांसाठी २१ दिवस लागणार असल्याची माहिती.समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सारथीवर घेणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे
अजितदादांनी शाहू महारजांची भेट घेतली याची मला कल्पना नाही.ते आशीर्वाद घ्यायला गेले असतील.सारथीच्या चर्चेची सुरुवात चांगली झाली हे महत्वाच.मूक आंदोलन मागे घेतलं नाही,तारखेला याचा निर्णय घेण्यात येईल.
याचबरोबर, समाजाच्या वतीने मी मांडलेल्या सूचनांनुसार सारथीसंबंधीत इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करावी, या मागणीसही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले.
More Stories
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!
डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर बुद्धिबळ स्पर्धा संपन्न