नेहमीच उज्वल यशाची परंपरा असणार्या
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित, महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे दि. १९/७/२०२१ रोजी इ १० वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.पी.टी.पाटील सर व अध्यक्ष म्हणून मा.श्री.जयकुमार शितोळे (बापू) हे उपस्थित होते.तसेच संस्थेचे सदस्य मा.श्री बी.के.भालके सर हे ही या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जी.ए.चव्हाण सर यांनी केले.त्याप्रसंगी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत त्यांनी विद्यालयाच्या निकालाची माहिती दिली
विद्यालयातून शै.वर्ष 2020-21मध्ये इ १० वी बोर्ड परीक्षेसाठी ४९० विद्यार्थी बसलेले होते. त्या पैकी सर्वच्या सर्व ४९०विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १००% लागल्याचे सांगितले.तसेच १०३ विद्यार्थी हे ९०% पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहेत असे सांगितले.
कु.सांगळे अमृता अशोक (१००% गुण),कु मिरगणे आदिती रविंद्र (९९%गुण),चि.पाटील शिवम नितीन (९९%गुण),चि.लांडगे पंकज भाऊसाहेब(९८.६०%गुण) व कु.काळे साक्षी प्रमोद (९८%गुण)या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ,कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील पुस्तक,पेन व बक्षिसाची रोख रक्कम देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उपस्थित पाहुणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर म्हणून कु अमृता सांगळे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले व पालकांमधून श्री.बी.यू.मिरगणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री.पी.टी.पाटील साहेब व संस्थेचे खजिनदार मा.श्री.जयकुमार शितोळे बापू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पवार एस.एस.मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती जाधव एस.जी.मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न