मोहोळ प्रतिनिधी: अमोल सावंत
मोहोळ प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि १ मे रोजी सकाळी ११.०० वा. मोहोळ येथे कोरोना बाधित रुग्णासाठी आमदार मा.श्री यशवंत(तात्या)माने यांचे प्रयत्नांतुन व महाराष्ट्र शासनाचे महसुल विभाग,समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग सह अन्य विभागाच्या सहकार्याने मोहोळ येथे १०० बेडचे सुसज्ज असे डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर उद्घाटन समारंभ माजी आमदार मा श्री राजनजी पाटील,जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम (काका)साठे,आमदार यशवंत(तात्या)माने,प्रांतधिकारी सचिन ढोले,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे मा प्रदेशाध्यक्ष,पंचायत समिती सदस्य मा अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे. यामध्ये २५ बेड ऑक्सिजन चे तर ७५ बेड नॉन ऑक्सिजन चे आहेत मोहोळ मतदारसंघातील कोरोना बाधित रुग्णाने याठिकाणी उपचार घ्यावे.
यावेळी सभापती रत्नमाला पोतदार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे,पोलीस निरीक्षक अशोक सायकर,उपसभापती अशोक सरवदे,पंचायत समिती सदस्य लाडे भाऊ,सदस्या सिंधुताई वाघमारे,कॉग्रेस तालुका अध्यक्ष मा अशोक देशमुख,शिवसेना चे तालुका अध्यक्ष मा अशोक भोसले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाथरुडकर,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डाॅ गायकवाड,डाॅ गवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षीरसागर,माजी सभापती नागेश साठे,उपनगराध्यक्ष प्रमोद डोके,नगरसेवक संतोष सुरवसे,अण्णा फडतरे,,विजय कोकाटे,सचिन चवरे,आनंद गावडे,बंडू देसाई,राजू सुतार, यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व इतर प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक