६ जून राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर शिवराज्याभिषेक दीनादिशी रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत.कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन,असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे.ते म्हणाले की,मी राज्यसभेचा पगार घेतो,ती माझी जबाबदारी आहे.आता लोकांची जबाबदारी नाही तर ती आता आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे,असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा केला.त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शरद पवार तसेच विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या व आपली भूमिका मांडली.
मराठा समाजाच्या प्रश्नासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
सारथीच्या समितीमध्ये समाजाची माणसं घ्या. सारथीला किमान एक हजार कोटी रुपये द्या.अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्उभारणी करण्यातयावी. हे तुमच्या हातात आहे ते तर द्या.३० टक्के श्रीमंत आहे त्यांना सोडून द्या पण ७० टक्के लोकांचा विचार व्हायला हवा आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही,आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही,असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं
याच सोबत तीन न्यायालयीन मुद्दे ही त्यांनी सांगितले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर