Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवासास मुभा

राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवासास मुभा

मित्राला शेअर करा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. १७) सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत मतदान होणार आहे.

राज्यातील सध्याच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी (१७ एप्रिल) प्रवासास मुभा. या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेले, मात्र सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाने सूचना जाहीर केल्या आहेत

तसेच निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी शिथिल करण्याचे आदेशही सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत

निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.