राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्ति वेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली जाणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पगाराबरोबर दिली जाणार आहे. तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा तसेच इतर अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हप्त्यांत थकबाकी रक्कम सप्टेंबर महिन्यातील पगारात दिली जाणार आहे.
शासनाने अधिसूचना काढून 30 जानेवारी 2019 सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी