व्हिडीओ क्रेडिट- सुहास घोडके
उजनी पाणी प्रश्न आणखी चिघळतो की काय अशी परिस्थिती सोलापूर जिल्ह्य़ात निर्माण होत आहे मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री भरणे मामा यांच्या विरोधात आंदोलने होताना दिसत आहेत.काही नेत्यांनी तर पालकमंत्र्यांना पाणी चोर, पाण्यावर डल्ला मारणारे असे म्हणत सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही अशी ही वक्तव्ये केली आहेत.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी योजना मंजूर केली.सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारल्याने जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या मार्गाने विरोध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उजनी धरणात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरु असून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी पहाटे पासूनच शिराळ टे,सुरली , उजनी टे,भिमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले आहेत . शेतकरी नेते अतुल खुपसे , जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख हे आंदोलनस्थळी पोहोचण्याच्या प्रयत्नात होते गोळ्या घातल्या तरी मागे हाटणर नाही अशी भूमिका त्यांनी घेतली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील , माढा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड,बाळासाहेब यादव,रांझणी यांनी पाठिंबा देऊन उजनी जलाशयात उतरले आहेत.
More Stories
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम