बार्शी शासनाने केलेल्या लॉकडाऊनला विरोध करत आंदोलन करण्यासाठी सर्व व्यापारी आज रस्त्यावर उतरले. या आंदोलनात शहरातील व्यापारी, व्यापारी संघटना सहभागी झाल्या . यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने सुभाषभाई बदामिया यांनी भूमिका मांडली.तसेच
शिवराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , बापु कदम यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , भाजपा नेते राजेंद्र मिरगणे , विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी आपली मनोगत व्यक्त करत शासनाला दुकाने बंदचा निर्णयावर फेरविचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले व्यापाऱ्यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना ही निवेदन सादर करण्यात आले आहे

More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन