सोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. आज त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपुर्द करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, डॉ.वैशाली कडूकर, प्रभारी मोटार ट्रान्सपोर्ट अधिकारी बालाजी कांबळे, पोलीस निरीक्षक सूरजितसिंह रजपूत आदी उपस्थित होते.
श्री.भरणे म्हणाले,नवीन गाड्यांमुळे पोलीस दलाला सक्षमपणे काम करता येणार आहे.बंदोबस्त,पोलीस स्टेशन यासाठी गाड्यांची त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यांनी झोकून देऊन काम करावे.
ग्रामीण पोलीस दलाला बंदोबस्त, बीट मार्शल, पोलीस स्टेशन, डायल ११२ पोलीस सेवा तत्काळ देण्यासाठी नवीन गाड्यांचा उपयोग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी ४६ लाख खर्चून ७५ मोटारसायकल, १७ स्कॉर्पियो, प्रत्येकी एक क्रेन, पाण्याचा टॅंकर, बॉम्ब शोधक पथक, इनोव्हा गाड्या ग्रामीण दलासाठी घेण्यात आल्या. शहर पोलीस दलासाठी पेट्रोलिंग, बीट मार्शल यासाठी दोन कोटी ५२ लाख खर्चून २७ मोटारसायकल, १५ स्कॉर्पिओ, दोन टाटा योद्धा क्रेन आणि चार कार घेण्यात आल्या आहेत.
वाहनांच्या या ताफ्यामुळे पोलीीस खात्याची ताकद वाढण्यास नक्कीच मदत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद