राज्याची व देशाची सद्यस्थिती पहाता स्मार्ट सिटी प्रोजेक्ट गुंडाळा, स्मार्ट वैद्यकीय सेवा द्या
टक्केवारीच्या गणितात कोरोना परस्थितीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्षच
सर्व विकास कामे बंद करुन, निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेकडे वळवावा अशी मागणी मराठी एकीकरण विकास आघाडीच्या अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी केली आहे
राज्या बरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना संसर्ग जन्य रोगाचा प्रसार वाढतच आहे. या रोगाचे बाधित रुग्ण पाहता महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असून सर्वसामान्य वर्गाला उपचार देण्यास कमी पडत आहे. शहरात कोरोनाचे बेड अपुरे असून त्या सबंधीच्या उपाययोजनेला देखील टक्केवारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच शहरात स्मार्ट सिटीची शेकडो कोट्यावधीची अनावाश्यक अनेक कामे सुरु आहेत. ही कामे म्हणजे राजकीय पुढारी, महापालिका उच्चस्थ अधिकारी व ठेकेदार यांचे कुरणच असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील आहे. त्यामुळे ही सर्व कामे बंद करुन स्मार्ट सिटीचा सर्व निधी स्मार्ट वैदयकीय सेवेकडे वळवावा अशी मागणी मराठी एकीकरण विकास आघाडी व सजग भ्रष्टाचार निर्मुलन महासंघाच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. तर शहरातील मंगल कार्यालय व पडून असलेले गृहप्रकल्प देखील कोवीड सेंटर म्हणून वापराचा विचार करावा असे देखील सुचवले आहे.
स्मार्ट सिटीचे काम कुणाचे आहे व ही कामे कोणकोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी वाटून घेतली आहेत. या कामाची टक्केवारी कशा पध्दतीने नगरसेवकापासून ते अधिकारी वर्गापर्यंत कशी वाटली जाते हे सर्व शहरवाशीयांना आता ज्ञात झाले आहे. या स्मार्ट सिटीची कामे किती झाली व त्याचा दर्जा काय आहे? व सध्य स्थितीला त्याचा लोकहितासाठी काय उपयोग होत आहे, हे महापालिकेने शहर वाशीयांना सांगणे गरजेचे आहे. पण माहापालिका प्रशासन व सत्ताधारी हे येथील नागरीकांना कदापी सांगणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. यावरुन यात गौडबंगाल काय आहे हे न समजण्या इतके पिंपरी चिंचवडकर आज्ञानी नाहीत. तसेच इतरही विकासकामाच्या नावाखाली सर्व ठिकाणी सध्य स्थितीला कोट्यावधी रुपायाचे कामे सुरु असून, ती अति महत्वाची नाहीत. त्यामुळे या कामावर होणार अफाट खर्च कमी करुन तो निधी देखील कोरोना रुग्णावर खर्च करावा. सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्या बरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामध्ये हजारो रुग्ण बाधीत झाले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांनी भरले असून यामध्ये महापालिका प्रशासनाची वैद्यकीय सेवा तोडकी पडत आहे. यामुळे कष्टकरी वर्गाला सेवा भेटत नाही. मरणाच्या भीतीमुळे अनेकांना खाजगी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत. पण तो खर्च पेलण्याची कुवत नसल्यामुळे नाईलाजावास्तव अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांची आर्थिक परस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे पैशा अभावी उपाचार करु शकत नाहीत. अशांना महापालिकेच्या सेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेने सर्वच विकास कामे बंद ठेवून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला प्राधान्य देऊन त्यासाठी निधी खर्ची करावा व नागरीकांचे जीव वाचवावे अशी आर्त मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न