जीवन जगत असतांना संवाद करणे गरजेचे आहे.संवादासाठी बोलण्याची आवश्यकता असते.पण कुठे बोलावे, केव्हा बोलावे हे आपणास ठाऊक असायला हवे.काही माणसं खूप बोलतात. काही माणस मोजून मापून बोलतात.जे जास्त बोलतात त्यांना समाजात काही किंमत नसते व जे मोजून मापून बोलतात त्यांना समाजात खूप महत्त्व दिले जाते.जास्त श्रवण करणे आणि कमीत कमी बोलणे त्या माणसाला खरच किंमत असते.परमेश्वराने आपणास दोन कान आणि एक तोंड दिले आहे.याच्या अर्थ आपण जास्त श्रवण करणे व कमी बोलणे होय.जास्त बोलायची गरज असती तर परमेश्वराने दोन तोंड व एक कान दिला असता दोन तोंड आणि एक कान असणारा माणूस दिसायला पण विचित्र दिसला असता.परमेश्वराने एवढे सुचक अवयव दिलेले असतांना आपण त्यांच्या नको त्या वेळेस वापर करतो.त्याच्यामुळे अनेक वेळा आपणास नुकसान होते.काही माणसांना नको तेथे, नको तेव्हा तोंड उघडण्याची सवय असते.बोलतांना आपण स्वतः ला तीन प्रश्न विचारले पाहिजे.पहिला प्रश्न मी जे बोलत आहे ते खरे आहे का? दुसरा प्रश्न मी जे बोलत आहे ते गरजेचे आहे का? तीसरा प्रश्न मी जे बोलत आहे महत्वाचे आहे का? या प्रश्नांचे उत्तर सकारात्मक येत असेल तरच बोला,नाहितर तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही.जी माणसं नको तिथे बोलतात,अनावश्यक ठिकाणी तोंड उघडतात त्यांचे नेहमी नुकसानच होते.
एक तलाव होता.त्याच्यात एक कासव राहत होते.त्या तलावावर पाणी पिण्यासाठी दोन बगळे यायचे.कासव व बगळ्यांमध्ये चांगली मैत्री झाली.ते एकमेकांवर खुप प्रेम करायला लागले.एकमेकांना सहकार्य करायचे. बगळे उडून गेल्यावर कासव पाण्यात लपून जायचे.कालांतराने तलावाचे पाणी आटले.तलाव कोरडा पडला. कासवाला भीती वाटायला लागली की मला लोक पकडून घेवून जातील.तेवढ्यात बगळे तिथे आले.ते कासवाला धीर द्यायला लागले.कासव त्यांना विनवू लागले कि मला वाचवा,मला दुसर्या तलावात सोडा.बगळे म्हणाले ठिक आहे आम्ही तुला दुसर्या तलावात घेवून जातो.पण एक अट आहे. आम्ही हि एक काठी आणलेली आहे.त्या काठीच्या दोघी बाजूला आम्ही चोचीने पकडू तु काठीला मधोमध तोंडाने पकड,पण एक गोष्ट लक्षात ठेव, मध्येच तोंड उघडायचे नाही.कासव म्हणाले ठिक आहे.ठरल्या प्रमाणे बगळ्यांनी आजूबाजूला काठी पकडली,कासवाने मधोमध तोंडाने काठी पकडली. ते आकाशात उडाले.जमीनीवरचे लोक त्यांच्या बघून आश्चर्य चकित होत होते.ज्या गावावरून ते जात होते त्या गावकऱ्यांची खूप गर्दी गोळा ते बगळ्या कडे व कासव कडे बघून आरोळ्या मारत होते.कासवाने खाली लोकांची गर्दी पाहिली आणि हे लोक काय गोंधळ करत आहेत हे उत्सुकतेने बगळ्यांना विचारण्यासाठी तोंड उघडले.तोंड उघडल्याबरोबर काठी त्याच्या तोंडातून सुटली. ते जमीनीवर आदळले.आणि जागेवरच मरण पावले.
तात्पर्य हेच कि नको तिथे तोंड उघडू नये त्याच्याने नुकसानच होते व प्रगती तेच करू शकतात जे शांत राहतात.
परींदो को मंजिल मिलेगी हमेशा
यह फैले हुए उनके पंख बोलते है।
वही लोग रहते ख़ामोश अक्सर
जमानेमे उनके हुनर बोलते है।
शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप