
कोरोना काळात बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा व सुविधा देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व प्रशासन हे सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत असून, बार्शी शहर व तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्याचा त्यांनी दृढनिश्चय करून चंग बांधला आहे.
बार्शी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तेथेच जवळपासच उपचार मिळण्याकरिता तालुक्यातील आगळगांव येथील लोकसेवा विद्यालय येथे, आगळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ५० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोवीड केअर सेंटरचा लाभ या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या २७ गावांतील कोरोना बाधित रुग्णांना मिळणार असून, त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा व सुविधा मिळणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, डॉ.कदम, जि.प.सदस्य किरण मोरे, पंचायत समिती सदस्य सुमंत गोरे, सरपंच सौ.पुतळानानी गरड, भाजपा सहकार सेल तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोरे, गणेश बप्पा डमरे, मुकेश डमरे उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले