बार्शी दिनांक ३० मे २०२१ श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक,संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ . मामासाहेब जगदाळे यांची ४० वी पुण्यतिथी त्यांच्या पुतळा परिसरात लॉकडाऊनचे शासकीय नियम पाळून भावपूर्ण वातावरणात पार पडली . बार्शीचे लोकप्रिय आमदार मा.श्री.राजाभाऊ राऊत जेष्ठ पत्रकार मा.श्री.राजा माने व नगराध्यक्ष मा.श्री . आसिफभाई तांबोळी हे कर्मवीरांना आदरांजली वाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
सकाळी ०८ = ३० वाजता मामांच्या पुतळ्यास फुले वाहुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मोजके संस्थेचे शाखाप्रमुख,शिक्षक उपस्थित होते.कर्मवीरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संस्थेचे मुखपत्र पाक्षिक ‘ कर्मवीर तपस्या’चे प्रकाशन मा.आमदार राजेंद्र राऊत व मा.श्री.राजा माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर पाक्षिकाचे संपादक प्राचार्य डॉ.चंद्रकांत मोरे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष डॉ . बी.वाय.यादव यांनी संस्थेच्या भावी उपक्रमाची माहिती देऊन सर्वांना सहकार्याचे आवाहन केले.मा.आमदार राजाभाऊ राऊत यांनी संस्थेच्या प्रत्येक उपक्रमांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.पत्रकार मा.श्री.राजा माने यांनी मामांनी सन १ ९ ७२ साली सुरु केलेल्या ‘ जीवन संग्राम ‘ वृत्तपत्राचे पुनरुजीवन झाले यांचा आनंद व्यक्त केला.या वृत्तपत्राने डिजिटल स्वरुपाकडे लवकर वाटचाल करावी अशी अशा व्यक्त केली.सदर वृत्तपत्र आशयाने सधन होण्यासाठी योगदान देण्याचे जाहीर केले.नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांनी या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यास सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे चेअरमन श्री.जयकुमार ( बापू ) शितोळे यांनी त्याच दिवशी ११ वाजता ह.भ.प. डॉ . जयवंत बाधले महाराज यांच्या ऑनलाईन कर्मवीर मामांवरील प्रवचना विषयी निवेदन केले.या कार्यक्रमाचे संचलन प्रा.किरण गाढवे यांनी केले.सकाळी ११:०० वाजता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ऑनलाईन ह.भ.प डॉ.जयवंत बोधले महाराज यांचे कर्मवीर मामांवरील प्रवचनाचे नियोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव यांनी केले.सर्व घटकांच्या वतीने मामांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले . व श्रोत्यांना संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.ह.भ.प. डॉ . जयवंत बोधले महाराज यांनी कर्मवीरांप्रती उत्कट भावना प्रकट करुन मामांनी सर्व सामान्य जनतेच्या उध्दारासाठी आपले आयुष्य कसे वेचले त्यामागील त्यांचे तत्वज्ञान काय होते यांचे सुरेख विवेचन संतवचनांचा आधार घेत कथन केले . त्यांचे हे प्रवचन संस्थेच्या इतिहासात अविस्मरणीय झाले.त्यानंतर सांस्कृतिक विभागाचे चेअरमन श्री . जयकुमार ( बापू ) शितोळे यांनी बोधले महाराजांच्या प्रवचनाचा आढावा घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.या ऑनलाईन प्रवचनाचा लाभ गावोगावच्या सुमारे ५०० कर्मवीर प्रेमी बंधूभगिनींनी घेतला.या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचलन प्रा.डॉ.परमेश्वर पाटील यांनी केले.या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.व्ही.एस . पाटील,जॉईंट सेक्रेटरी श्री.पी.टी . पाटील,खजिनदार श्री . डी.एस.रेवडकर कार्यकारिणी सदस्य दिलीप मोहिते,शशिकांत पवार तसेच सर्व पदाधिकारी,व संस्थेचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद