कोरोनाची आलेली दुसरी लाट ही खूप मोठ्या प्रमाणात आली. ग्रामीण भागामध्ये या कोरोना लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पहिल्या फेज पेक्षा या लाटेमध्ये लोक कोरोनाबाधित झाले कोरोनीमुळं आपण नातेवाईकांना गमावीन बसलो. आपण कोरोनाचा प्रसार रोखु शकलो आपल गाव वाड्या वस्त्या कोरोनापासून वाचवू शकलो तर गाव कोरोनीमुक्त होईल, गाव कोरोनामुक्त झाल तर शहर आणि शहर कोरोनामुक्त झालं तर आपले राज्य अन् राज्य कोरोनामुक्त झालं तर देश कोरोनामुक्त होईल अशा भावना मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधन करत असताना सांगितलेलं होतं असं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
पद्मश्री पोपटराव पवार हिवरे बाजार जिल्हा नगर यांनी आपल्या गावामध्ये चांगला पॅटर्न राबवला होता तसंच अनेक चांगल्या सरपंचांनी कोरोना गावच्या वेशीवर रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले असंही ते यावेळी म्हणाले.
या सर्व गोष्टींचा विचार करून आपण राज्यामध्ये एक चांगली योजना आणलेली आहे सहा विभागामध्ये आपण प्रत्येक क्रुतीला ५० गुण दिलेले आहेत आणि या ५० गुणांपैकी जास्त गुण जे घेतील अशा ६ विभागांमध्ये ३ बक्षिसं देणार आहोत. ५०००००० च पहिल बक्षिस २५००००० च दुसर बक्षिस आणि १५००००० लाखाचं तीसरं बक्षिस अशा गावाला त्यांना लागणाऱ्या विकासकामांना देखील पहिल्या नंबरला ५०००००० लाख दुसऱ्या क्रमांकाला २५००००० आणि तिसऱ्या येणाऱ्या क्रमांकाला १५००००० लाख आमच्या ग्रामविकास विभागाच्या २५१५ आणि ३०५४ विकासनिधीमधून आम्ही निधी देणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद