पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत आढावा बैठका घेतल्या
अकलूज येथील बैठकीत गावपातळीवर कोविड सेंटर उभी करण्याबाबत चर्चा करण्यात आली
पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूहातर्फे अभिजीत पाटील यांचे पन्नास बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये तीस आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तीस बेडची क्षमता वाढवली जाणार आहे.
कुर्डुवाडी येथे माढा तालुक्यातील आढावा बैठकीत कुर्डुवाडीत आणखी २२ ऑक्सिजन बेड येत्या उपलब्ध केले जातील दोन दिवसात कुर्डुवाडी शहरातील अपूर्वा हॉस्पिटलमध्ये १५ आणि सर्वेश हॉस्पिटलमध्ये ७ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
रेल्वेच्या रुग्णालयाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी अश्या सूचना त्यांनी दिल्या
करमाळा तालुक्यात ३० ऑक्सिजन बेडची त्वरित सुविधा पालकमंत्री दत्तात्रय भरणे असे बैठकीत सांगितले
जेऊर येथे २० आणि करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ऑक्सिजन बेडची सुविधा त्वरित निर्माण करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ऑक्सिजन, औषधे आणि इतर सुविधा याबाबत सुयोग्य नियोजन करा. येत्या आठवड्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, काही ठिकाणी चालक नसतील तर कंत्राटी तत्वावर भरती करावी. खाजगी रुग्णालये रुग्णांकडून जादा पैसे आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पाच हजार लोकसंख्येच्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करावे. त्यांना त्वरित परवानगी द्यावी असेही ते म्हणाले
लसीचे योग्य नियोजन करा, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लसीकरण जास्तीत जास्त करून घ्या,
भाजी मंडई एकाठिकाणी येणार नाही, गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून जनतेसाठी उपलब्ध राहावे सूचना श्री. भरणे यांनी केल्या.
शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बार्शी येथे दिल्या. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद