
अधिकारी, लोकप्रतिनिधी,स्थानिक यांनी एकत्र येऊन लढा दिला तरच यशस्वी होऊ शकतो अश्या आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्या नंतर शासकीय आदेशाची वाट न पहाता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत बार्शीचे आमदार राऊत यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली.
ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तेथेच जवळपासच उपचार मिळण्याकरिता तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच सध्या पांगरीच्या ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सीजन बेडची उपलब्धता असून पांगरी व या परिसरातील १५ गावांतील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून त्यांना आरोग्यसेवा व सुविधा मिळणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांनी दिली.
पांगरी येथे ५० बेडच्या कोवीड केअर सेंटरला आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या सोयी-सुविधांची पाहणी करून अडी-अडचणींची माहिती घेऊन, काही बाबींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, पांगरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रवींद्र माळी, डॉ.गायकवाड मॅडम, ॲड.अनिल पाटील, विलास जगदाळे, सरपंच सौ. सुरेखा लाडे, उपसरपंच धनंजय खवले, संजीव बगाडे, सुहास देशमुख, सतीश जाधव, जयंत पाटील, रियाज बागवान, विलास लाडे उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल