Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > गडचिरोली जिल्ह्य़ात १3 नक्षलवादयाना कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्य़ात १3 नक्षलवादयाना कंठस्नान

मित्राला शेअर करा
१३ मे ला जप्त केलेला शास्त्र साठा

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-60 पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता.प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-60 पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते.एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर हल्लानक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जाते. पोलीस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क राहावे लागत आहे.

१३ मे ला गडचिरोली इथं धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन एक एसएलआर रायफल, ८ एम.एम. रायफल, कूकर बॉम्ब व स्फोटके तसेच दैनंदिन वापराचे साहित्य ताब्यात घेतले होते