Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > गिरीश महाजन यांनी दिली खास शैलीत प्रतिक्रिया बंगालमध्ये तीन मतदार संघात भाजपला माझ्यामुळं विजय मिळाला

गिरीश महाजन यांनी दिली खास शैलीत प्रतिक्रिया बंगालमध्ये तीन मतदार संघात भाजपला माझ्यामुळं विजय मिळाला

मित्राला शेअर करा

पाश्चिम बंगाल राज्यातील एकूण २९२ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल २१२ मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २१२ आणि भाजप ७७ असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करणार आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती.

भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने पश्चिम बंगालमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची जबादारी दिली होती. त्यासाठी तब्बल वीस दिवस ते त्या ठिकाणी ठाण मांडून होते. पक्षाचे नेते अमित शहा प्रचारासाठी बंगालमध्ये आले असताना ते महाजन यांना प्रचार गाडीवर येण्याचे आवाहन करतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन महाजन यांच्यावर टीकाही झाली होती होती.

महाजन यांनी दिली आपल्या शैलीत प्रतिक्रिया
त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे म्हटले आहे. यात बलूरघाट- अशोक लहरी, गंगारामपूर_- सत्येंद्रनाथ राय, तपण – बुद्धराय तुहू हे उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
महाजन म्हणाले की, बढणे दो हमे..मत रोको हमे, अभी तो सुरुवात है, बहोत उंचा उडना है हमे..कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु, भाजपने राष्ट्रवादी विचार सोडला नाही. या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आम्ही ताकदीने लढलो आणि तीनवरून 75 वर पोचलो. पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन.