राज्यात १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते ना.नवाब मलिक यांनी दिली
१८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरण अधिक वेगानं होण्यास मदत होणार आहे. तसंच अधिकाधिक लोकांना लस देता येणार आहे.
दरम्यान, मागच्या कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कालच जाहीर केलं आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्याची लोकसंख्या अणि लसीची उपलब्धता आणि फक्त शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण याचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्राचे लसीकरण करण्यास वेळ लागणार आहे
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद