Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > जिल्ह्यातील मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करणार :पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

जिल्ह्यातील मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करणार :पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मित्राला शेअर करा

सोलापूर,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील १८ वर्षे वयाखालील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा सांगितले.
कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री.भरणे बोलत होते.
श्री.भरणे म्हणाले,
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील बालके ११ लाख ९२ हजार एवढी असून लहान मुलांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४० बेडची सोय करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ लहान मुलांचे दवाखाने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये २४० बेडची तात्पुरती सोय केली
सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड देऊन कोरोनाग्रस्त लहान मुलांची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीला मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या ५२ टीम आहेत.या टीममधील डॉक्टरांद्वारे गावोगावी लहान मुलांची तपासणी करण्यात येणार आहे

श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेट्रोलिंग करण्यात येणार असून संस्थात्मक विलगीकरण, संसर्ग वाढविणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे.

डॉ.ढेले यांनी म्युकर मायकोसिसवर आतापर्यंत ३४९ इंजेक्शन प्राप्त झाल्याचे सांगितले.