
ठाणे गुन्हे शाखा घटक ०१ यांनी १२००० जिलेटीन कांड्या व ३००७ इलेक्ट्रिक डेटोनेटर इ. स्फोटक पदार्थांचा विनापरवाना साठा करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून एकूण रु २,०२,६२० किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. पथकानं जप्त केलेला हा स्फोटकांचा साठा एवढा मोठा होता, की तो पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. स्फोटकांचा हा एवढा मोठा साठा अवैधरित्या साठवणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे.ठाणे गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजेच्या सुमारास भिवंडी कारवली गांव इथं खानि जवळ धाड टाकली. याठिकाणी गोदामात स्फोटके असल्याची माहिती मिळाली होती यामधे
बारा हजार जिलेटीन व तीन हजार डेटीनेटर कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
गुरुनाथ काशिनाथ म्हात्रे रा. कालवार असे अवैध जिलेटीन साठा साठविल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या कारीवली येथील महेश स्टोन चाळीत असलेल्या कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असतानाही मोठ्या प्रमाणात जिलेटीन व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा एकुण २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा स्फोटक पदार्थांचा साठा विना परवाना व बेकायदेशीरित्या साठविला असल्याचे आढळून आले.
खदाणीत स्फोट घडवण्यासाठी या जिलेटीन कांड्या वापरल्या जात असाव्यात असा अंदाज असला तरी ही ही स्फोटक बेकायदेशीर रित्या साठवण्यात आली होती.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक