Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > ढोकी येथे शॉपिंग सेंटरला आग दुकान जळाले

ढोकी येथे शॉपिंग सेंटरला आग दुकान जळाले

मित्राला शेअर करा

शॉपिंग सेंटरला आग दुकान जळाले

ढोकी येथे महावितरण कार्यालयासमोरील शॉपिंग सेंटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजले. तात्काळ नगर परिषद कळंब व उस्मानाबाद अग्निशामक दलाशी संपर्क करून घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना दिल्या व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणीही केली.

या आगीमध्ये जवळपास ८ ते १० दुकानांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी आपुलकीने चर्चा केली. ‘जनता कर्फ्यू’ असल्याने सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्याचे या व्यापाऱ्यांनी सांगितले.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.