Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी कोरफळे केंद्रात दुसरी तंबाखू मुक्त शाळा

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी कोरफळे केंद्रात दुसरी तंबाखू मुक्त शाळा

मित्राला शेअर करा

भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधरित ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी ही शाळा या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शुभांगी लाड,श्री रामचंद्र वाघमारे कोरफळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महादेव शिंदे यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेवाडी कोरफळे केंद्रात दुसरी तंबाखू मुक्त शाळा झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती साधना काकडे मॅडम ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री एल एस जाधव साहेब बळेवाडी चे सरपंच लक्ष्मण मोरे उपसरपंच सौ शालन रेडके , अध्यक्ष सौ सुजाता साळुंखे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक श्री आनंद कायते शाळेतील शिक्षिका श्रीमती मगर यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी प्रयत्न केले.