
दहशतवाद विरोधी पथक , नागपाडा युनिट,मुंबईचे प्र.पो.नि संतोष भालेकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडून इसम नामे जिगर पंड्या,रा.ठाणे,हा शासनाने प्रतिबंधीत पदार्थ म्हणुन निर्देशित केलेल्या युरेनियमचे तुकडे विकत आहे.त्यानुसार प्र.पो.नि. भालेकर व पथक यांनी सापळा रचून यशस्वीरित्या जिगर पंड्या यास ताब्यात घेतले.जिगर पंड्या याच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये नमूद संशयित युरेनियमचे तुकडे त्याला त्याचा मित्र अबु ताहिर , रा.मानखुर्द,याने त्यास विकण्याकरीता दिल्याचे समजले.त्यानंतर नागपाडा युनिटचे पोलीस अधिकारी व पथक यांनी त्वरीत अबु ताहिर अफजल चौधरी यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने लोहार गल्ली मधील गाळा , कुर्ला स्क्रेप मर्चट असोशिएशन (मानखुर्द ) मंडाला,गोवंडी,मुंबई येथे संशयित युरेनियम ठेवल्याचे सांगितले.परिणामी नमूद पोलीस पथकाने सदर ठिकाणीहून अबु ताहिर अफजल चौधरी याने काढून दिलेले ७ किलो १०० ग्रॅमचे संशयित युरेनियम हे पंचनामा अंतर्गत ताब्यात घेतले . जप्त करण्यात आलेले संशयित युरेनियम हे बी.ए.आर.सी. येथे तपासणी करीता पाठविण्यात आले . बी.ए.आर.सी.कडून सदरचे संशयित युरेनियम हे ” नैसर्गिक युरेनियम ‘ असल्याचे व नमूद पदार्थ हे अतिशय धोकादाय असून किरणोत्सर्ग सोडणारा व मानवी जिवीतास हानीकारक असल्याचे अभिप्राय दिले.त्यानंतर अटोमिक एनर्जी कायद्यातील तरतूदींनुसार प्रादेशिक संचालक , दक्षिण प्रादेशिक विभाग,अटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्प्लोरेशन अॅन्ड रिसर्च,अटॉमिक एनर्जी विभाग,सिव्हील लाईन,नागपूर,यांच्या फिर्यादी वरुन शासनाने प्रतिबंधीत पदार्थ म्हणुन निर्देशित केलेले नैसर्गिक युरेनियम जवळ बाळगल्याबाबत आरोपी जिगर जयेश पंड्या आणि अबु ताहिर अफजल चौधरी यांच्या विरुध्द दिनांक ०५/०५/२०२१ रोजी दहशतवा विरोधी पथक , काळाचौकी पोलीस ठाणे येथे अटोमिक एनर्जी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . जप्त करण्यात आलेल्या ७ किलो १०० ग्रॅम नैसर्गिक युरेनियमची अंदाजे किंमत २१ कोटी ३० लाख रुपये आहे. दोन्ही आरोपींना माननिय न्यायालयाने दिनांक १२/०५/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी बाबतचे आदेश दिलेले आहे.सदरची कारवाई दहशतवाद विरोधी पथकातील नागपाडा युनिटचे प्र.पो.नि संतोष भालेकर,सपोनि प्रशांत सावंत,पो.ह.मुल्ला,पो.ना. धावले,पो.ह.पांडे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.अधिक तपास चालू आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले