Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > दोष आपलाच, पण आपण दोष दुसर्‍यात पाहतो

दोष आपलाच, पण आपण दोष दुसर्‍यात पाहतो

मित्राला शेअर करा

मानवी स्वभाव गुण आहे कि आपण जे करतो तेच खरे आहे .आपण जे बोलतो तेच बरोबर आहे.आपण जे वागतो तेच योग्य आहे.समोरच्याच वागणं,बोलण,चालणं याला सर्व चुकीचेच वाटते.जे पण काही दोष असतील समोरच्या व्यक्तीमध्येच आहेत. माझात अजिबात दोष नाही. पण परिस्थिती नेमकी उलटी असते दोष तर याच्यातच असतात पण त्याला स्वतःचे दोष दिसत नाही.त्याला समोरचा व्यक्तीच दोषी दिसतो.
एकदा पती -पत्नीचा सुखी संसार चालू होता.वय वाढत गेल्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण व्हायला लागल्यात. पतीला वाटलं आपल्या पत्नीला ऐकू येत नाही म्हणून डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा अस ठरवलं. पती डॉक्टरांकडे गेले ,डॉक्टरांना विचारले ,डॉक्टर साहेब पत्नीला ऐकू येत नाही, काय कराव?डॉक्टर म्हणाले,20 फुटावरून आरोळी द्यावी,तरीपण ऐकू येत नसेल तर 15फुट, 10फुट 5फुट अंतरावर थांबून आरोळी द्यावी.पती घरी आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पत्नीला 20 फुटावरून आरोळी दिली,अहो कारभारणी भाजी काय केली? पत्निला ऐकू आले नसेल म्हणून 15 फुट,10 फुटावरून,5 फुटावरून आरोळी दिली.शेवटी अगदी जवळ जाऊन विचारले,अगं मी तुला केव्हाचा विचारतो आहे ,तु काही उत्तरच देत नाही.तेव्हा पत्नी म्हणाली अहो तुम्हाला 17 वेळा ओरडून ओरडून सांगितले भजीची आमटी केली म्हणून
तात्पर्य हेच की तो स्वतःच बहिरा आहे आणि पत्निला बहिरा समजत आहे
दोष आपलाच असतो पण आपण दुसर्‍यालाच दोषी समजतो

पल पल जलना पडता है

तब पता चलता है,पितल है या सोना।
समझदारी वही होती है
दुसरो को दोष देने से पहले ,खुद को परखना।शब्दांकन

-श्री.यशवंत निकवाडे ,बालाजीनगर, शिरपूर.