शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत.
विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.नांदेड शहरात तणावाचे वातावरण बनले असून वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर