Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास राहुल कुंकूलोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संगणक भेट

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास राहुल कुंकूलोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संगणक भेट

मित्राला शेअर करा

अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.1 साठी प्रसन्नदाता गणेश मंडळाच्या माध्यमातून राहूल अशोकशेठ कुंकूलोळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एक संगणक संच भेट देऊन राष्ट्रीय कोविड19 लसीकरण मोहिमेला हातभार लावून बार्शी शहरामध्ये आदर्श निर्माण केला आहे.
 
सध्या शहर कार्यक्षेत्रामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 1 या मध्यवर्ती ठिकाणी कोविड 19 लसीकरण केंद्र चालू असून त्यामध्ये 45 वर्ष वयोगटातील व्यक्तीला ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदणी करून लस देण्यात येत आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षापुढील व्यक्तीना कोविड 19 लसीकरण देण्यात येणार आहे, त्याची आवश्यकता ओळखता प्रसन्नदाता गणेश मंडळाच्या माध्यमातून राहूल अशोकशेठ कुंकूलोळ यांनी आपल्या 45 व्या वाढदिवसानिमित समाजकार्य म्हणून सदर केंद्राला 1 संगणक संच प्रिंटरसह व 1 संगणक चालकासह उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर वाढदिवसानिमित्त शहराचे प्रथम नागरीक तथा नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, प्रसन्नदाता गणेश मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी मेहता, अजित कुंकूलोळ, बंडू माने, अमोल येवनकर, प्रमोद भंडारी, हर्षल रसाळ, व इतर मंडळाचे सर्व सदस्य, डॉ. रामचंद्र जगताप, पत्रकार संतोष सुर्यवंशी उपस्थितीत होते, प्रशासनाला व समाजाला सतत आम्ही मोलाचे सहकार्य करु असे मनोगत प्रसन्नदाता गणेश मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी मेहता यांनी व्यक्त केले. सदर वाढदिवस सर्वाच्या उपस्थितीत राहूल कुंकूलोळ यांनी केक कापून साजरा केला.

रक्तदान श्रेष्ठ दान

राहूल अशोकशेठ कुंकूलोळ यांनी एक संगणक संच भेट दिल्याबददल सदर लसीकरण मोहिमेस गतीप्राप्त होईल, असे आभार वैदयकिय अधिकारी डॉ. नितीन लाड व औषध निर्माण अधिकारी केदारनाथ बेताळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, NUHM नोडल अधिकारी डॉ. सुधीर घोडके, लिपिक ईश्वर सोनवणे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते.