
निपाणी ता.भूम जि.धाराशिव येथे महाराष्ट्र दिन व कोव्हीड १९ मुळे रक्ताचा तुटवडयाची जाणीव ठेवून महारक्तदान शिबिर संपन्न
भूम तालुक्यातील निपाणी येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व ग्रामस्थ निपाणी, माळेवाडी, आंद्रुड व लांजेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कोव्हीड १९ मुळे रक्ताचा तुटवडयाची जाणीव ठेवून व मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मा.राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आव्हान व मा.छायाताई भगत संस्थापक अध्यक्ष विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा झालेला आहे. पार्श्वभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन स्नेहल घोडके सरपंच निपाणी , रुपाली गिरी पोलीस पाटील, रमेश कोकाटे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच), मुस्तफा पठाण तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक भाजपा भूम, रामभाऊ कोकाटे माजी पोलीस पाटील, खंडू कोकाटे उपसरपंच, यांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रमेश कोकाटे माजी सरपंच व त्यांचे भाऊ हनुमंत कोकाटे, बालाजी घोडके,बाळराजे आवाड, लांजेश्वर ,कृष्णा व शंकर कोकाटे भाऊ, भरत तिवारी, नंदु राऊत, आदीने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला
यावेळी जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे धाराशिव, परंडा तालुका आरोग्यदूत राहूल शिंदे, तालुका समन्वयक तानाजी कासारे, रविंद्र तांबे परंडा सदस्य, किशोर गटकळ तालुका समन्वयक भूम, शिवाजी घोळवे तालुका समन्वयक वाशी यांच्यासह रक्तदाते उपस्थितीत होते. तसेच श्री.नवले व त्यांचे सहकारी भगवंत ब्लड बँक बार्शी जि.सोलापूर यांनी संकलन केले.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले