मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सकडून राज्यातील कोविड स्थितीचा आढावा बैठक आयोजितकरण्यातआली. या बैठकीस आरोग्यमंत्री,मुख्य सचिव,आदी सर्व संबधीत अधिकारी उपस्थित होते. निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याबद्दल टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती. नागरिक वेळीच चाचणी करून घेत नसल्याचे गंभीर परिणाम निदर्शनास येत आहेत.
या बैठकीत
मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध.
ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहर व परिसरातील सुविधा मिळण्याची व्यवस्था करा. केवळ मुंबई-पुण्यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे ही पहाण्याचे आदेश देण्यात आले
साध्या राज्यात एकूण 3,03475 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी. विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होम पद्धतीतून काम करू द्यावे- मुख्यमंत्री असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या आढावा बैठकीत दिले आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद