- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात करण्यात येणारआहेत.
दोन महिन्यांतील अंदाजित कामाचे दिवस 35 गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात एकूण 156 रुपये 80 पैसे आणि इयत्ता सहा ते आठ साठी 324 रुपये 85 पैसे जमा होतील
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,२०१३ ( NFSA ) अंतर्गत देशातील सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा ५ किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहे.केंद्र शासनाच्या मोफत धान्य देण्याच्या तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण ( DBT ) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याचे नियोजन केलेले आहे.केंद्र शासनाच्या उपरोक्त नियोजनाप्रमाणे योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील आहार खर्चाची रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बॅक खाते माहिती खालील विहित नमुन्यात अद्ययावत करुन तयार ठेवण्यात यावी , तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांचे बैंक खाते उघडण्यात आले नसेल , अशा विद्यार्थ्यांचे आधार लिंक बॅक खाते उघडण्याबाबत संबंधिताना आपल्यास्तरावरुन लेखी सूचना देण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यातील शापोआ योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे १०० % बॅक खाते उघडण्यात यावेत असे आदेश देण्यातआले आहेत.
दिनांक ९जुलै २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी,जेणेकरुन शासनस्तरावरुन पुढील निर्देश प्राप्त होताच उचित कार्यवाही करण्याकरीता सदर माहिती उपलब्ध करुन देणे शक्य होणारआहे.बँक खाते उघडण्याकरीता शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना निर्गमित करण्यात यावेत अश्या सूचना दत्तात्रय जगताप शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी दिल्या आहेत.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले