Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बड्डे आहे झाडाचा ?बार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस

बड्डे आहे झाडाचा ?बार्शीत साजरा होतो झाडाचा वाढदिवस

मित्राला शेअर करा

झाडांचा वाढदिवस

बार्शी शहरातील विस्तारीत भाग म्हणजे ऊपळाई रोड अणि आलीपूर रोड या भागाची ओळख(लॅन्ड मार्क)
म्हणजे दोन लिंब अणि चोर लिंब ही झाडे काळाच्या ओघात नष्ट झाली.जुन्या लोकांना ही झाडे चांगली ओळखीची होती.

याच ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन ऑक्सिजन चे प्रमुख स्त्रोत असलेले एक वड आणि दोन लिंब या झाडांची लागवड करुण वृक्ष संवर्धन समिती च्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात ५ जुन २०१९ ला झाली.त्या दोन झाडांचा वाढदिवस समितीने मागच्या वर्षी साजरा केला होता व या वर्षीही तो करणार आहेत.

सर्व प्रकारचे कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे.तरी सर्व वृक्ष प्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी या झाड रुपी बालकाला शुभाशिर्वाद देण्या करीता उपस्तिथ रहावे असे आमंत्रण बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीने दिले आहे याच सोबत
बर्थडे बॉयला तुमचे गिफ्ट हार तुरे गुच्छ नको आहे,ईच्छा असेल तर येताना एक बॉटल पाणी आणावे,आपल्या परिसरातील झाडांची सुद्धा काळजी घ्यावी अशी विनंती सुद्धा केली आहे
बार्शीकरांच्या कौतुकास पात्र ठरलेलया संपूर्ण वृक्ष संवर्धन समिती सदस्य बार्शी शहर आणि परीसरात वृक्ष लागवड व संवर्धन ही चळवळ अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे चालवत आहे.अतिशय थोड्या कालावधीमध्ये समितीच्या माध्यमातून झाडे फक्त लावलीच गेली नाहीत तर पोटच्या पोरा प्रमाणे जपून त्यांची ती मोठी देखील केली आहेत याच सोबत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे काम सुद्धा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून राबवले जातात.

याचाच परिणाम म्हणजे शहरातील शिवाजी कॉलेज रोड,उपळाई रोड व बार्शी शहरातील तसेच परिसरातील रस्ते आज हिरवे दिसू लागले आहेत.