
विजेता जिमचे संस्थापक आणि युवा उद्योजक विजयसिंह उर्फ बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजेता ग्रुप व बापूसाहेब युवा मंच व छत्रपती ग्रुप च्या वतीने बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजनच्या 51 जम्बो टाक्या देण्यात आल्या. कोरोनाचा वाढता कहर पाहता, कोरोना रुग्णांना कमी पडणारा ऑक्सिजन, आरोग्य विभागावरील ताण आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विजेता ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले. आत्तापर्यंत विजेता ग्रुप आणि बापूसाहेब युवा मंचच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. डॉ शीतल बोपलकर यांनी पाटील परिवाराच्या या अनोख्या आणि समाजउपयोगी उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी विजय राऊत, गणेश गोडसे, अजय पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करत बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध संघटना व युवकांना असे उपक्रम राबवून समाजाला बळकटी देण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ शीतल बोपलकर, बार्शी वकील संघांचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, विजयसिंह पाटील, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, पत्रकार गणेश गोडसे, पत्रकार संजय बारबोले छत्रपती ग्रुप चे सचिव बापू पवार पत्रकार विजय कोरे मिलिंद जाधव पिंटू राऊत सारंग चौगुले रोहित वाघमारे असिफ तांबोळी मनोज चिंचकर राज देवकुळे रोहित मोहिते देवा कुलकर्णी नागेश मोहिते जेयश ठाकुर आदी उपस्थित होते
एकंदरीत रेमडेसिवीर इंजेक्शन चा ळाबाजार अश्या बातम्या कानावर येत असताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांचा हा उपक्रम समजाला एक वेगळी दिशा दाखवणारा उपक्रम आहे
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक