आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दि व्यापारी मर्चंट असोसिएशन, बार्शी नगरपरिषदेचे ठेकेदार, तसेच दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन लोकवर्गणीतून अन्नदान करण्याचा निर्णय घेतला.
सामाजिक बांधिलकी जपत या सर्वांनी कोरोना विरूद्धच्या लढाईत लढताना खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना बाधीत रुग्णांना उपचार घेत असताना त्यांच्या जेवणाची हेळसांड होवू नये, तसेच त्यांना सकस आहार मिळावा म्हणून त्यांना सकाळचा नाश्ता व दोन वेळचे जेवण देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला आहे.
बार्शीतील सर्व कोविड हॉस्पिटल मधील कोरोना बाधीत रुग्णांना मोफत नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्याचा शुभारंभ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल येथून करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, बापूसाहेब शितोळे, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, डॉ. जगताप, नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे, रितेश वाघमारे, व्यापारी असोसिएशनचे दामोदर काळदाते, तुकाराम माने, नवनाथ गपाट, देवाशेठ खटोड, भरतेश गांधी, सचिन मडके, कांतीलाल मर्दा, अरूण मुंढे, संतोष बोराडे, सुनील ढाळे, बापूसाहेब पाटील, बाळासाहेब पुरोहित, धनू पाटील आदी उपस्थित होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक