बार्शी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका व्यक्तिने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.आत्महत्या केलेली व्यक्ती चिखर्डे या गावची असून नाव उमेश भागवत कोंढारे वय-३७ वर्षे आहे. काही दिवसांपूर्वी कोंढारे आणि त्यांच्या कुटुंबातील आई,पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बार्शीतील पॉलिटेक्निक येथे असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
उमेश यांनी आज पहाटे फाशी घेतल्याचे तेथील स्टाफच्या निदर्शनास आल्यानंतर तेथील स्टाफने बार्शी पोलिस स्टेशनला कळविले. अद्याप फाशीचे खरे कारण समोर आलेले नाही.
बार्शी तालुक्यातील व शहरातील आत्महत्यांचे प्रमाण ही खुपच गंभीर बाब बनली आहे.

More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक