बार्शी दि .३१ लाॅकडाऊन मुळे सर्व महा ई सेवा केंद्र व डिजिटल उतारे देणारी केंद्र बंद असल्याने याचा फायदा घेतात की काय या पद्धतीने वागत तलाठी कार्यालयात तलाठी अन त्यांच्याकडून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून आर्थिक पिळवणूक सुरू आहे कोरोनामुळे नागरिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत,तर दुसऱ्या बाजूला तलाठी सातबारा उताऱ्यासाठी दुप्पट तिप्पट तिप्पट रक्कम वसूल करत आहेत तर दलाल डेव्हलपर्स यांना मात्र शाही वागणूक दिली जाते कोरोना महामारीमुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाल्याने मोठा आर्थिक संघर्ष सुरू आहे.अशा स्थितीत तलाठी कार्यालयात शेतीच्या व तत्सम कारणांसाठी सातबारा उतारा काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून दुप्पट तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे.वास्तविक सध्याचा काळ सामान्य जनतेसाठी पाच रुपये,दहा रुपये बचत करून तोच कुटुंबासाठी वापरात आणत शेतकरी व त्यावर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक आलेला दिवस कसाबसा ढकलत आहेत.असे असतानाही तलाठी कार्यालयाला याचे भान नाही.कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही , लॉकडाउन आणखी वाढविण्यात आला आहे शिवाय कित्येकांचे आर्थिक स्रोत बंद पडले आहेत . वापरण्याचा काळ अशावेळी कार्यालयीन कामासाठी तलाठी कार्यालयात येणाऱ्यांना नियमाप्रमाणेच रक्कम आकारली गेली पाहिजे.दुर्दैवाने मुख्य तलाठी तथा त्यांच्या हाताखाली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.काम कोरोना काळातही नागरिकांकडून आर्थिक लूट करणारे कर्मचारी यांच्यावर तहसीलदारांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे,अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होईल.असा सूर त्या ठिकाणी कामासंदर्भात आलेल्या शेतकरी व नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद